मुंबई, दि.९,(punetoday9news) :- जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगर-दऱ्या, रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण, संवर्धन तर केलंच, बरोबरीनं प्रथा-परंपरा, लोककला, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून देशाचं सांस्कृतिक वैभव समृद्ध केलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांचा गौरव केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आदिवासी समाजबांधवांना त्याग, शौर्य, देशप्रेमाचा गौरवशाली इतिहास आहे. राष्ट्रउभारणीत आदिवासी बांधवांचं मोठं योगदान आहे. समाजानं कायमंच निसर्गाशी नातं जपलं आहे. हे नातं जपत असताना आधुनिक काळाचा वेध घेऊन आदिवासी युवक आज उच्च शिक्षण घेवून जीवनाच्या अनेक क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्तानं दिला आहे.
Comments are closed