पिंपरी,दि. ९ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस माथाडी कामगार संघटना सांगवीच्या वतीने अध्यक्ष गणेश ढमाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरस्वती अनाथ आश्रम दापोडी मधील मुलांना शालेय वस्तू, सँनिटायझर , मास्क, अन्न – धान्य वाटप करून मदत देण्यात आली .
यावेळी हर्षल वारे याने १० वी शालांत परिक्षेत पास झाल्या बद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यास पुढील शिक्षणासाठी मदत देण्यात आली यावेळी गणेश ढमाले यांनी बोलताना शिक्षण मुलांचा पाया आहे तो मजबूत केला तर मुलांचे भवितव्य उज्वल होईल व ते आपले पुढील जीवन आनंदाने जगतील. या कोरोना काळामध्ये अनाथ विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करावी असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी नितीन लोकरे, गजानन गाजरे, दिपक कदम, निखिल गाडुते, सागर शिंदे, निलेश मुदलियार, गौतम भिंगारे उपस्थित होते
संयोजक जय गणेश ग्रुप व रण झुंजार मित्र मंडळ सुत्रसंचालन शाम ढमाले व आभार विकास लोले यांनी मानले.
Comments are closed