पिंपरी,दि.९.( punetoday9news ) :- पिंपरी-चिंचवड मधील दिघी येथे घरगुती गॅसच्या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात १२ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. रात्रभर गॅस ची गळती होऊन सकाळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू केल्यावर स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा स्फोट खूप मोठ्या स्वरूपाचा असल्याने शेजारील फ्लॅटचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भिंती, दरवाजे असून खिडक्या ग्रीलसह निखळल्या गेल्या आहेत. तर घरातील इतर साहित्याचे देखील नुकसान झाले आहे .

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत ज्ञानेश्वर टेमकर यांचा मृत्यू झाला आहे. टेमकर कुटुंबातील मंगला टेमकर, अनुष्का टेमकर (वय ७), यशश्री टेमकर (वय २.५) हे जखमी झाले असून त्यांच्या घरी दोन नातेवाईक आणि त्यांची दोन मुले होती ते देखील या घटनेत जखमी झाले आहेत तर शेजारील फ्लॅट मधील महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय ३५), आकांशा सुरवाडे (वय १५), दीक्षा सुरवाडे (वय १३), अमित सुरवाडे (वय ८) हे जखमी झाले असून या सर्वांना रुग्णालयात भरती करण्यात आले .

Comments are closed

error: Content is protected !!