पिंपरी,दि.९.( punetoday9news) :- नऊ ऑगस्ट क्रांति दिनानिमित्त दापोडी येथे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

दापोडी येथील सिएमई गेट समोर असलेल्या क्रांतिवीर  हुतात्मा नारायणराव दाभाडे व शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास  पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर माई ढोरे व क्रांतिवीर नारायण दाभाडे यांच्या भावजय सरोज दाभाडे व पुतणे धनंजय  व विजय दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व फिजिकल डिस्टनसिंग व इतर नियम पाळून क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा नारायणराव दाभाडे यांचे नातू पद्मसेन, चंद्रसेन, सोहम दाभाडे व सांगवी येथील सोनार प्रतिष्ठान सांगवीच्या वतीने यावेळी सोनार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत खोल्लम, नाना वानखेडे, राजेंद्र खोल्लम, प्रमोद बागुल, संदीप दाभाडे, मनोज सोनवणे उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!