नवी दिल्ली,दि. ९. (punetoday9news):- अयोध्येतील श्री राम मंदिराचा भूमिपूजन आणि शिलान्यास कार्यक्रम १६ कोटीहून अधिक लोकांनी थेट प्रसारणाद्वारे पाहिला. प्रसार भारतीच्या प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा सांगण्यात आला आहे.
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेणपती म्हणाले की, बुधवारी सकाळी १०.४५ ते दुपारी २ या दरम्यान सुमारे २०० टीव्ही वाहिन्यांनी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण प्रसारित केले होते .
ते म्हणाले की, परिणामी, भारतातील टीव्हीच्या जगातला हा सोहळा एकूण ७ अब्ज मिनिटांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांनी पाहिला. ते म्हणाले, “पूर्वीच्या प्राथमिक अंदाजानुसार, अयोध्येतील श्री राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम १६ कोटीहून अधिक लोकांनी थेट पाहिला.”
Comments are closed