सांगवी: वार्ताहर
नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकात वाहतूक बेटाच्या चुकलेल्या जागेमुळे वाहन चालकास बेटास वळसा घालून वळणे अवघड बनले आहे. त्यामुळे एम एस काटे चौकाकडून आलेली सर्रास सर्व वाहने साई चौकाच्या दिशेने वाहतूक बेटाच्या अलीकडील बाजूने वळत असल्याने जुनी सांगवी कडून येणार्या वाहनचालकांसमोर गोंधळाची स्थिती निर्माण होते.
काही वर्षांपूर्वी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नवी सांगवी , पिंपळे गुरव परिसरातील चौकात विविध संदेश देणारी वाहतूक बेटे उभारली मात्र यातील बहुतेक चौकात पुरेश्या जागेअभावी उभारलेली वाहतूक बेटं जड वाहतूकीसाठी मात्र अडचणीची ठरत आहेत. तर माहेश्वरी चौकात पुरेशी जागा उपलब्ध असताना ही वाहतूक बेट केंद्रस्थानी न आल्याने जड वाहनांना त्याला वळसा घालून वळणे अग्निपरीक्षा ठरते. त्यामुळे जड वाहनासोबतच दुचाकीस्वार सुद्धा बेटास वळसा घालण्याची तसदी घेत नाही व या शाॅर्टकट च्या प्रयत्नात दुसरया वाहनाखाली जाण्याचा धोका पत्करतात. काही वाहन चालकांच्या मते जर ह्या वाहतुक बेटाचे स्थान केंद्रस्थानी झाले तर अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होईल.
Comments are closed