पुणे दि.१०(punetoday9news):- पुणे शहरातील वाहतुक विभागात नोव्हेंबर २०१७ पासून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी ११५ वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत.

सदरची वाहने ओळखून घेऊन जाण्याबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी करुन तसेच सदर वाहनांचे मालकांचा शोध घेऊनही मालक मिळून आलेले नाही. या वाहनांची स्थितीही खुप दिवस पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहेत.

या वाहनांची कायदेशीर बाबींची पुर्तता करुन लिलावाची मंजुरी मिळालेली असून सदर वाहनांचा लिलाव १४ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वा. पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथील आवारात करण्यात येणार असल्याचे येरवडा वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!