दिल्ली , १० . (punetoday9news):-कोरोना मुळे आयपीएल चा निर्माण झालेला पेच सुटला आहे . बीसीसीआयचा रस्ता मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्याची परवानगी दिली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलने याआधीच १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन होणार असल्याचं जाहीर करण्यात आले होते . या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय व अन्य संबंधित सरकारी  यंत्रणांची परवानगी बीसीसीआयला मिळाली होती. फक्त गृह मंत्रालयाच्या परवानगी राहिली होती. 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रस्तावित असलेल्या परवानगीबद्दल विचारलं असता ब्रिजेश पटेल यांनी, बीसीसीआयला सर्व परवानगी लिखीत स्वरुपात मिळाली असल्याचं सांगितले . भारतातली कोणतीही स्पर्धा देशाबाहेर आयोजित करायची असल्यास त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी गरजेची असते. परवानगी मिळाल्याने यंदाच्या आयपीएलवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले आहे.कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सर्व नियमांचे पालन केल्यानंतर २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएई करता रवाना होण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!