सांगवी: वार्ताहर

 

नवी सांगवी येथील साई चौक मधील जॉगिंग ट्रॅक वर अंधाराचा फायदा घेत अंधार व चारचाकी गाड्यांच्या आडोसा घेत मद्यपी व प्रेमीयुगुलांमुळे महिला, जेष्ठ नागरिकांची मात्र कुचंबणा होत आहे  . महापालिकेने लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे मात्र येथे अर्धा ट्रॅक मुले , महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अर्धा ट्रेक मद्यपीवर, प्रेमी युगुलांसाठी अशी स्थिती निर्माण झाली आहे.  अर्ध्या ट्रॅकवर झाडांमुळे दिव्यांचा प्रकाश  न पडल्याने अंधार पसरतो व  शेजारी पार्क केेेलेल्या चार चाकी गाड्यांंचा आडोसा या स्थितीचा प्रेमी युगल व मद्यपी फायदा  घेताना दिसून येतात. तसेच टवाळखोर मुले आरडाओरडा करत वाढदिवस साजरा करताना दिसतात.   मद्यपी व प्रेमीयुगुलांचे अश्लील बोलणे व विचित्र वागणे त्यामुळे व्यायामासाठी जॉगिंगसाठी येणाऱ्या येणाऱ्यांची मात्र येणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळा  मद्यपी दारूच्या नशेत  आपसात  भांडतात , मारामारी करतात तसेच   प्रेमी युगलांचे ही विचित्र चाळे पाहून लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना पालकांना मात्र  सारवासारव करण्याची वेळ येते  त्यामुळे  या प्रकारांनी बालमनावर होणाऱ्या  कुसंस्कारांना थांबवणे ही तेवढेच गरजेचे आहे. परिणामी नवीन ट्रॅक झाल्यावर वाढलेली नागरिकांची गर्दी हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने येथील झाडाच्या फांद्या तोडून प्रकाशासाठी वाट मोकळी करावी व पोलिसांनीही लक्ष देऊन अशा टवाळखोर युवकांवर, मद्यपींवर व प्रेमी युगुलांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

 

फोटो 1 :   जॉगिंग ट्रॅक कडेने वाढलेली झाडे व पार्क केलेली वाहने.

#

Comments are closed

error: Content is protected !!