पिंपरी, दि.११(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवी येथे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करताना विजेचा तीव्र धक्का बसून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दुपारी बाराच्या दरम्यान घडली.
हनुमंत नागनाथ भिसे (वय ३२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. नवी सांगवी परिसरात सोमवार (ता. १०) रात्रीपासून वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. काही भागात कमी दाबाने वीज प्रवाह सुरू होता. त्यामुळे भिसे व त्यांचे सहकारी शनिमंदिर जवळील डीपी दुरुस्तीच्या कामाला आले होते. भिसे डीपीवर चढुन विद्युत प्रवाह सुरळीत करताना अचानक त्यांना विजेचा झटका. त्यात ते पंचवीस फुटावरून खाली फेकले गेले. तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले भिसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक बहिण, असा परिवार आहे.
जनरेटर चा उलटा विद्युत प्रवाह आल्याने दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहे.
Comments are closed