मुंबई, दि.१२.(punetoday9news):- अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. मागील आठवड्यात श्वसनास त्रास होत असल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला होता. आता एक दुख:द गंभीर माहिती समोर आली आहे त्यात संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग (कॅन्सर) झाला आहे.
संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.
आता तब्येत ठीक नसल्याचे सांगून संजय दत्तने आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. फुफ्फुसाचा कर्करोग असल्याने संजय दत्तला उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता आहे.
Comments are closed