राजपूत प्रकरणात अप्रत्यक्षपणे पवारांचा नातवाला टोला.
पिंपरी, दि.१२.(punetoday9news):- बाॅलिवुड मधील सुशांत राजपूत प्रकरणात प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी मुंबई पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचे सांगितले आहे.
यावरून प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली असली तरी टीकेची तोफ ही अप्रत्यक्षपणे पार्थ पवार यांच्याकडे वळलेली दिसते. पवारांचा हेतू जरी सुशांत प्रकरणात जास्त राजकीय ढवळाढवळ होत असल्याबाबद असला तरी चर्चा मात्र आजोबा आणि नातु यांचीच रंगली आहे. शरद पवार यांनी सुशांतची आत्महत्या ही दुर्दैवी असल्याचे सांगुन मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत जर कुणाला सीबीआय चौकशी करायची असल्यास विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Comments are closed