पुणे,दि.१२.(punetoday9news):- गुंजवणी धरण व घिसर परिसरात पावसाचा जोर, पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे विद्युत गृहातून ३०० क्युसेस ने प्रवाह सुरू करण्यात आला असून धरणातून एकुण विसर्ग ३०० क्युसेस येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी , गुंजवणी नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed