पुणे दि.१२( punetoday9news):-पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण, ता. खेड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे.

एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
एअर लिक्वीड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करण्याकरीता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी १३२ के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, २२० के.व्ही. व्होकसवॅगन ते २२० के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी व २२० के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व २२ के.व्ही. व १३२ के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत बंद करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कोवीड-१९ साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा उत्पादन व पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणेकरीता हा आदेश पारीत करण्यात आला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!