मुंबई,दि.१३( punetoday9news):- मुंबईतील मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाबद्दल महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना म्हणजेच सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मानधनात एवढी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या इतिहासात प्रथमच घेण्यात आल्याचा उल्लेख करून हा निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या प्रश्‍नात लक्ष घालून तो मार्गी लावल्याबद्दल सेंट्रल मार्डने त्यांचेही विशेष आभार मानले आहेत.

या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्या वेतनात १ मे २०२० पासून दरमहा दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. राज्य शासनावर यामुळे २९ कोटी ६७ लाख ६० हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.निवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रश्नावर निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. यानंतरही त्यांची मागणी प्रलंबित होती आजच्या निर्णयामुळे ती पूर्ण झाली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!