पिंपरी, दि.१३.(punetoday9news):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या गुणपत्रिका १७ ऑगस्ट पासून देण्यात येणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर न करण्याची सूचना राज्य मंडळाने शाळांना दिली आहे.
शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्या. १७ ऑगस्टपासून शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका द्याव्यात . विद्यार्थ्यांनी ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये . शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशाप्रकारे नियोजन करण्याचे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.
Comments are closed