पिंपरी,दि.१३.(punetoday9news):- कोरोना वर लसीची प्रतिक्षा असताना सद्यस्थितीत प्लाझ्मा थेरपी महाराष्ट्रात उपयुक्त ठरत आहे.
महाराष्ट्र शासन या साठी कोरोना मुक्त रूग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी वारंवार आवाहन करत आहे. मात्र बरेच कोरोना तुन बरे झालेले पेशंट प्लाझ्मा दान करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान विषयी नागरिकांच्या मनातील शंका, गैरसमज दुर करणे गरजेचे आहे.
त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोहसीन अत्तार यांनी  वायसीएम हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा डोनेट करून इतरांना आदर्श संदेश  दिला आहे. त्याला अनुसरून कोरोना तून बरे झालेल्या रूग्णांनी पुढे येवून फ्लाझ्मा दान केल्यास अधिकाधिक रूग्णांना याचा फायदा होईल.

Comments are closed

error: Content is protected !!