पुणे, १४.(punetoday9news):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडला आहे. भाजपाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
 सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे मोदी हे चौथे पंतप्रधान ठरले असून सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस बाहेरील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.
 २०१४ लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने विजय मिळवल्यानंतर २०१८ ला देखील ऐतिहासिक विजय मिळवला व मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एकूण २,२६७ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होते. मोदी यांनी हा आकडा मागे टाकत नवा विक्रम गाठला आहे. याचबरोबर पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे सर्वात प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री असल्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!