पुणे,दि.१४( punetoday9news):- महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावी- बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

याबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

दहावीची परीक्षा ६ ते २३ ऑक्टोबरदरम्यान, बारावीची परीक्षा ६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!