पिंपरी,दि.१५(punetoday9news):- पुणे शहरातील खडकी येथील ऑल सेंट्स हायस्कूल शाळेमध्ये ७४ वा स्वातंत्र्य दिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक जस्सूराज अंगदुराई यांच्या हस्ते करण्यात आले शाळेमध्ये सोशल डिस्टंसिंग च्या नियमानुसार फक्त पाच शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्याचे काटेकोर पालन करत विद्यार्थी नसतानाही शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे, अभिजीत परदेशी, सागर हेगनेश्वर, प्रतीक काटे यांनी ध्वजारोहणाचे नियोजन केले . तोंडावर मास्क वापरणे आजच्या काळात बंधनकारक आहे असा संदेश देत संचलन (मार्च पास) करत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी केले. या ऑनलाईन कार्यक्रमात शाळेतील १०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले तसेच स्वातंत्र्य सैनिक , महापुरुषांची वेशभूषा परिधान करून त्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्व व योगदान पटवून दिले . काही विद्यार्थ्यांनी चित्र काढून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली तर काहींनी भाषणे सादर केली. आपल्या आपल्या घरातून सहभागी झाले होते . पूर्ण कार्यक्रम लाईव्ह युट्युब आणि फेसबुक द्वारे पालक वर्ग यांना हा पूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला. ह्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग, संचालक जयसिंग डी. यांनी मन भरून कौतुक केले.
तर पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल मध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वैशाली दिंडाळ यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोखंडे तर आभार प्रदर्शन जागृती धर्माधिकारी यांनी केले प्रत्येक शाळेत या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच शिक्षकांची मर्यादा असल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व सोशल डिस्टन्स पाळत साजरा करण्यात आला. कार्यक्रम उत्तमरीतीने संपन्न झाला . शाळेचे सेक्रेटरी राजेश मनाकांत यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
Comments are closed