पिंपळे गुरव येथे राजमाता जिजाऊ उद्यानात गेल्या दोन वर्षापासून कोटयावधी रूपये खर्च करून उद्यानाचे आधुनिकीकरण व नुतनीकरनाचे काम चालू आहे. परंतु उद्यानाला राजमाता जिजाऊ असे नाव आहे परंतु उद्यानाच्या नावाप्रमाणे उद्यानात राजमाता जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा नसणे योग्य वाटत नाही या उद्यानाला नागरिक डायनोसर उद्यान म्हणून संबोधले जाते. उद्यानात दुबई च्या धर्तीवर मिराकल उद्यानाचे काम चालू आहे त्यातच पालिकेने राजमाता जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा उभारला तर पिंपरी – चिंचवडच्या नावलौकिकात अजुन भर पडेल.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारणाऱ्या शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, सर्व धर्माना समान वागणूक हे पंचतत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या जिजाऊंचा पुर्णाकृती भव्य पुतळा व्हावा जेणेकरून उद्यानात आलेल्या नागरिकांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहून प्रेरणा मिळेल,त्यांच्या प्रेरनेतुन स्वराज्य निर्माण झाले, स्त्रियांना प्रोत्साहित करणाऱ्या व बळकट बनवणाऱ्या राजमातेचा भव्य पुर्णाकृती पुतळा प्रेरणास्त्रोत ठरेल यात शंकाच नाही.
आपण पिंपरी चिंचवड नागरिकांच्या भावनांचा विचार करून पुर्णाकृती पुतळा उभारावा आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी मा. आ.लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष भा.ज.पा यांना विवेदण देऊन मागणी करण्यात आली.यावेळी आ.जगताप यांनी आम्हाला काम चालू आहे तोपर्यंत आपण योग्य सुचना करा त्याचा ही विचार करु असे आश्वासन दिले.
यावेळी,संस्थेचे पिं. चिं. शहर,अध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे ,कार्याध्यक्ष, गजानन धारशिवकर ,युवक शहर अध्यक्ष, अतिश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष ,नियाज शेख ,बदाम काबळे,गोरखनाथ वाघमारे आळंदी शहराध्यक्ष रवी भेंनकी,अक्षय जगदाळे, निलेश जगदाळे, प्रकाश अत्रे,अशोक जाधव, कार्तिक जगदाळे, अशूतोष जगदाळे ,श्रीनिवास पानसरे ,वाघमारे, सा.का.किसन फसके,संदीप गायकवाड, पि.पी पिल्ले,बंडेवार प्रकाश,,वसंत मांढे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed