पिंपरी,दि.१५. (punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . यावेळी नगरसेवक सागर अंघोळकर यांनी नागरिकांनी कोरोना या महामारीला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे ,पुढच्या वर्षी आपला देश कोरोना मुक्त वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करेल असा विश्वास व्यक्त केला. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार आन्ना जोगदंड यांनी शहीद झालेल्या सैनिकांच्या शौर्य गाथेची माहीती देऊन देशभक्ती जाग्रत केली . देशभक्ती च्या गीतांनी परीसर देशभक्तीमय झाला होता.
साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पर्यावरण पुरक रांगोळी काढून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
यावेळी नगरसेवक सागर आंघोळकर व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंपळे गुरवच्या वतीने केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांच्या हस्ते, गुणवंत कामगार, आण्णा जोगदंड, सूरेश कंक, प्रकाश घोरपडे, कवी शरद शेजवळ , याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिशू मंदिर,शिक्षिका प्रतिभा मरड , केंद्र संचालक प्रदिप बोरसे, पवण पवार, उपस्थित होते .
Comments are closed