पिंपरी, दि . १५ ( punetoday9news):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत असून यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास लाखो लोक रस्त्यावर जमा होतील आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक विसर्जनाला परवानगी देण्यात येणार नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनदेखील रद्द करण्यात आले असून कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!