पिंपरी , दि १५ ( punetoday9news):- पावसाची संततधार चालू असल्याने मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे टाटा पॉवर च्या वतीने पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग, शाखा अभियंता पिरंगूट, तहसिलदार मुळशी, पोलिस निरीक्षक, पौड यांना सूचित करण्यात आले आहे . तसेच नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
उद्या दि. १६ रोजी सकाळी ११:०० वा मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सूरू करण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो.
तरी धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed