पुणे,दि.१५.(punetoday9news):- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेल्थ कार्ड , संरक्षण विभाग , आत्मनिर्भर भारत , मेक फॉर वर्ल्ड अशा घोषणा दिल्या .

भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर असल्याची माहिती दिली . वैज्ञानिकांनी संमती दिल्यावर लसींचे मोठ्या प्रमाणावर निर्माण करून देशभर वितरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाणार असून आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. कार्डधारकाच्या आजाराविषयी आणि उपचाराविषयी सर्व माहिती या कार्डमध्ये असेल. कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. दहशतवाद तसेच विस्तारवादाचा मुकाबला भारत भक्कमपणे करत असून LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी ज्यांनी भारताच्या अखंडतेत बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला त्यांना भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचेही सांगितले .
पंतप्रधान मोदी यांनी याव्यतिरिक्तही अनेक मुद्यांवर भाष्य केले असून यामध्ये अंमलबजावणी केलेल्या विविध योजनांचा दाखलादेखील त्यांनी दिला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!