नवी दिल्ली,दि.१५ ( punetoday9news):- माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्राम वरून त्याने ही माहिती दिली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. २००८ ते २०१४ दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने २००७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-२० ट्रॉफी जिंकली होती. २०१० आणि २०१६ साली त्याने आशिया कप जिंकला आहे.२०११ साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
Comments are closed