पिंपरी, दि.१५( punetoday9news):- पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून कोरोना महामारीच्या संकटकाळात रुग्णसेवा तातडीने मदत व्हावी यासाठी येथील औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले या मुळे कोरोना महामारी च्या संकट काळात रुग्णसेवेची रूग्णसेवेला दिलासा मिळून मदत होणार आहे सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून स्वातंत्र्यदिनी जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी एल काकणे डॉ.शर्मिला गायकवाड डॉ.संतोष देशपांडे, बालाजी वाडजे, संदीप बर्डे, संजय मराठे आदींच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
ही रुग्णवाहिका अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज असलेली जिल्हा रुग्णालयाकडे अशी एकमेव रुग्णवाहिका असणार आहे यात स्पाईन बोर्ड, व्हील चेअर, सेक्शन पंप, इलेक्ट्रिक सेक्शन पंप, सेल्फ ईन्फर्टेटेबल बँग, माऊथ टू मास्क व्हेंटिलेटर डिवाइस,ऑक्सीजन सिलेंडर,आदी अत्याधुनिक उपकरणं या रुग्णवाहिकेत सज्ज असणार आहेत.या रुग्णवाहिकेची किंमत पंचवीस लाख इतकी आहे या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना तातडीची सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
Comments are closed