नवी दिल्ली, दि. १५( punetoday9news):- धोनीचा आवडता व विश्वासू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानेसुद्धा निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्राम  पोस्टमधून रैनाने मीसुद्धा तुझ्या प्रवासात तुला साथ द्यायचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत रैनाने क्रिकेटला अलविदा केला आहे.

मधल्या फळीतला भरवशाचा फलंदात आणि संघाच्या गरजेनुसार ऑफस्पिन बॉलिंग करून यश मिळवणारा रैना एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.

कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे.

सुरेश रैना यानेसुद्धा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला काही काळ गाजवला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या काही खेळी लक्षात राहणाऱ्या आहेत. वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात त्याचं स्थान लक्षात राहण्यासारखं होतं. त्याने त्या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

भारतीय संघाकडून त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१८ मध्ये खेळला होता. दरम्यान, भारताकडून सुरेश रैनाने २२६ एकदिवसीय,७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत.

रैनाने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,६१५ धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा आणि १३ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये १,६०५ धावा केल्या आहेत.

आता धोनीबरोबरच रैनानेसुद्धा क्रिकेट संन्यास जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना आणखी हुरहूर लागली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!