पिंपरी,दि.१५(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर आणि आयुक्त यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर भागात कोरोणा रुग्णांची संख्येत वाढ झाली असल्याने रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडत असून त्यासाठी केलेल्या रक्तदानाचा आवाहनानुसार व पुणे शहर आरोग्य विभागाच्या (हॉस्पिटल) केलेल्या मागणीनुसार, श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास व जिज्ञासा सोशल वेलफेअर ट्रस्ट तसेच वाय.सी.एम.हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१५ रोजी “रक्तदान शिबीर” घेण्यात आले.

हे चौथे शिबीर असुन आज एकुण ७५ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला . त्यावेळी पिं. चिं. चे महापौर माई ढोरे, न्यासाचे अध्यक्ष शरदराव ढोरे, न्यासाचे उपाध्यक्ष नंदकिशोर सगणे, सचिव मधुकर कोल्हे, खजिनदार ओंकार अंबुलकर व  जिज्ञासा सोशल वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष मोहन तोडकर, कार्याध्यक्ष डॉ गणेश गरूड ,उपाध्यक्ष मंगेश भूजबळ, सचिव जीवन पवार, खजिनदार  रोशन अहिरे, व विश्वस्त आणि न्यासाचे व मंडळाचे कार्यकर्ते, सेवेकरी उपस्थित होते. सर्वाच्या वतीने विजय केचे आणि डॉ गणेश गरूड यांनी सर्व रक्तदात्यांचे व रक्तपेढी च्या सर्व स्टाफ चे आभार मानले. १५ आँगस्ट निमित्ताने स्वातंत्र दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आणि या पुढे संयुक्त रितीने असेच समाजासाठी , समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडू असे आपल्या भाषणात सांगितले. खरोखरच अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध रितीने कोरोना महामारी च्या काळात सर्वांनी सोशल डिस्टंशिंग , मास्क आणि सँनिटायझर चा वापर केला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विश्वस्त बब्रुवाहन वाघ यांनी श्रीं चा गजर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments are closed

error: Content is protected !!