पिंपरी, दि.१६( punetoday9news):- सुर्यकांत मुळे यांच्या वडील या पुस्तकाचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षका मार्फत वितरण करण्यात आले.
यामध्ये वडीलांच्या जन्मापासुन ते मृत्यू पर्यंतचा प्रवासाचे त्यांनी वर्णन केलेले आहे. त्यांनी कुटुंबासाठी किती कष्ट घेतले. व स्वतः च्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत चा प्रवास कसा झाला माहिती दिली आहे. आपण स्वतः साठी नव्हे तर कुटुंबासाठी जगले पाहिजे, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून दुसऱ्याच्या शेतात राबराब राभले व मुलांना चांगले शिक्षण देऊन , उच्च संस्कार ही दिले.
वडील हे पुस्तक वाचून प्रत्येक मुलामध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे.म्हणून हे पुस्तक मुलापर्यंत मोफत उपलब्ध देण्याचे नियोजन केले. स्वतत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शेकडो शाळेत आजपर्यंत वाटत करण्यात आले. आजही जिल्हा परिषद शाळा मालेगाव, चिंचवंतवाडी, , तांबोळा या शाळेत शिक्षक व मुख्यध्यापक,यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
सर्व पुस्तके उपलब्ध असून मागेल त्या शाळेला दिली जातील असे मुळे यांनी सांगितले.
आईचे महत्त्व सांगणारे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत पण वडील तसे दुर्लक्षित राहिले आहेत . काबाडकष्ट कष्ट करणारे वडील मुलांच्या आठवणीत रहावा म्हणून मी वडील हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक वाचून मूलांमध्ये प्रेरणा निर्माण होईल असे मुळे यांना वाटते.
Comments are closed