पिंपरी,दि.१६( punetoday9news):- पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ व सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती) आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरिता ‘तीज सतू सजावट ‘ स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
या स्पर्धेतील विजेत्या महिला प्रथम- दीपा कासट (अमरावती), व्दितीय- प्रीती पुंगलिया (पुणे), तृतीय- सोनाली बिहानी (शिरूर) या राहिल्या.
श्रावण कृष्ण पक्षातील तृतिया (तीज ) या दिवशी येणाऱ्या सणाला मारवाडी समाजात मोठे महत्व आहे. या दिवशी महिला दिवसभर उपवास धरून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. त्याला सतू तीज असे म्हणतात. विविध धान्यापासून बनवलेल्या शिवलिंगच्या आकारासारख्या पदार्थाला सतू असे म्हणतात . या पदार्थाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवले जाते.
अशी आगळीवेगळी स्पर्धा सांगवी परिसर महेश मंडळ तर्फे ऑनलाईन ट्रोकेट ॲपवर घेण्यात आली. या स्पर्धेत मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, गुजरात, राजस्थान व परदेशातून अमेरिका येथील महिलांनी भाग घेतला.
(फोटो:- महिलांनी सादर केलेल्या स्पर्धेतील विविध कलाकृती)
या स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते . महिलांनी पदार्थ बनवताना त्याचे छायाचित्रण करून सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची माहिती दिली . त्या छायाचित्रणास जनतेतून मते मागविण्यात आली. त्या स्पर्धेला ८० हजारहून अधिक प्रेक्षकांनी ऑनलाईन भेट दिली. स्पर्धेचे पंच हेही ऑनलाईन होते. पंच म्हणून ब्रह्मानंद लाहोटी व प्रीती लाहोटी यांनी कामगिरी पार पाडली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी सारडा , ऑनलाईन ट्रोकेट अँपचे अनुप धीरन, सांगवी महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, पद्मा लोहिया, कविता लद्धा यांनी परिश्रम घेतले .
Comments are closed