पिंपरी, दि.१६( punetoday9news):- कोरोना आणि लॉकडाऊनमुळं बेजार झालेल्या पुणेकरांसाठी खूशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. जवळपास पाच महिन्यानंतर नागरिकांना प्रवासासाठी पीएमपीएमएल बससेवा चालू होणार आहे. पण एकाच वेळी पूर्ण  क्षमतेने बस रस्त्यावर न येता ४०० ते ४५० बसेस धावतील.  प्रवाशांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागु राहतील.  मात्र त्याचे नियोजन कसे असेल हेही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र यावेळी गणेशोत्सव हा नियमांच्या अधीन असल्याने मंदिरातच धार्मिक विधी करत साजरा करण्याचे आदेश आहेत.त्यामुळे बससेवेला कितपत प्रतिसाद मिळेल हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरेल.

सार्वजनिक वाहतूक गरजेची असली तरी लाॅकडाऊन मध्ये जवळपास २ हजारहून अधिक चारचाकी खासगी वाहनांची खरेदीसाठी पुणेकरांनी बुकींग केल्याचे चित्र आहे.  त्यात दूचाकी ची अधिकची भर आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असली तरी त्याचा वापर यापुढील काळात किती प्रमाणात होईल हे लवकरच स्पष्ट होईल.

 

Comments are closed

error: Content is protected !!