कोयना धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांवर उघडले.
पिंपरी,दि.१७ (punetodaynews):- सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे.
कोल्हापूर मधील पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६.९ इतकी आहे, तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ही पाणी पातळी ३२ फुटांवर गेली आहे.
राधानगरी, कोयना, वारणा धरणांमधूनही मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे ४ दरवाजे सुरू आहेत. यातून होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांवर उघडण्यात आलेत. त्यातून ५५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून २ लाख २२ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पण सततच्या पावसामुळे सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून जिल्ह्यातील सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
Comments are closed