अहमदनगर दि.१७ (punetoday9news):- राजकीय क्षेत्रात कोरोनाची लागण वाढत असल्याने राजकीय मंडळींमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे .
शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी केली जात आहे त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असे टोपे म्हणाले.
शरद पवार या वयातही सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत.त्यांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले . “शरद पवार हे महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्यांचे आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.
Comments are closed