पुणे,दि.१७ (punetoday9news):-
पुण्याचे माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्तीने रिक्त जागेवर तीन प्रमुख नावांची चर्चा होती काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेनेकडून वेगळी नवे पुढे करण्यात आली होती त्यापैकी डॉ. राजेश देशमुख यांना राष्ट्रवादीची पसंती असल्याचे बोलले जात होते . त्यानुसार डॉ. राजेश देशमुख ह्यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अनुभवाच्या बाबतीत त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची ते जागा घेतील. राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जाग रिक्त झाली होती.
राम यांची पीएमओत नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, आज (सोमवार) राज्य सरकार कडून पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Comments are closed