पिंपरी,दि.१८(punetoday9news):- जिल्हा सामान्य रुग्णालय औंध येथून जैव कचरा अनाधिकृत पद्धतीने मनपा वाहनांमध्ये टाकून हा कचरा सांगवी संकलन केंद्रात टाकला जात आहे .येथून येणाऱ्या कचरा वाहक वाहनांची तपासणी केली असता त्यावेळी या वाहनांमध्ये बायोवेस्ट असल्याचे लक्षात आले सध्या कोरोना महामारी असतानाही यामध्ये पीपीइ किटस, मास्क, इंजेक्शन, हातमोजे इत्यादी हे बायोवेस्ट काळया रंगाच्या प्लास्टिक मोठ्या पिशवीमध्ये बांधून वाहनामध्ये टाकले जाते . नियमानुसार यासाठी काळ्या रंगाच्या पिशव्या न वापरता पिवळ्या रंगाच्या पिशव्या वापरायला हव्या .मात्र सद्यस्थितीत चालू असलेल्या प्रकाराने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो .
मनसे कार्यकर्ते राजू सावळे यांनी सांगितले कि , प्रत्यक्ष पाहणीत वाहन क्रमांक एम.एच.१४ एच.यु -३२३७ या वाहनामधून बायोवेस्ट चुकीच्या पद्धतीने नेले जात होते. हे हाताळताना आरोग्याची काळजी न घेता, नियमांचे पालन न करता कचरा टाकण्याचे काम चालू आहे . वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली तरीही मनमानी कारभार चालूच आहे . पुन्हा लक्षात आणवून दिल्यानंतर येथिल आरोग्य निरिक्षक यांच्याकडून समक्ष पाहणी झाली त्यानाही खात्री पटली कि या कचऱ्यात बायोवेस्ट टाकले जात आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करावी असे आरोग्य वरिष्ठ अधिकांऱ्याना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. जर या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने योग्यविल्हेवाट लावली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Comments are closed