स्वाजीलँड दि.१८ (punetoday9news):- दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश स्वाजीलँड पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा गरीब देश पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्या देशातील राजा. या देशाचे राजे असणारे मस्वाती तिसरे हे आपल्या संपत्तीसाठी आणि पैशांच्या (गैर)वापरासाठी कायमच चर्चेत असतात. मस्वाती यांनी १५ लग्न केली असून आता पुन्हा एकदा ते लग्न करण्याच्या तयारीत आहेत.
उम्स्वाती तिसरा हा दक्षिण आफ्रिका भागातील स्वाझीलँड देशाचा राजा व स्वाझीलँड शाही परिवाराचा कुटुंबप्रमुख आहे. स्वाझीलँडच्या संविधानाने राजाला राज्यकारभाराचे सर्व अधिकार दिले असून पंतप्रधान व मंत्रीमंडळाची निवड उम्स्वाती करतो. सर्व राज्यहक्क असलेला तो आफ्रिका खंडामधील अखेरचा विद्यमान राजा आहे. मस्वाती यांचे वडील राजे सोभुजा यांना तब्बल १२५ बायका होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मस्वाती यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवली आहे. अवघ्या ४७ वर्षांच्या मस्वातींनी आतापर्यंत १५ लग्नं केली आहेत. २०१३ मध्ये त्यांनी १८ वर्षांच्या मुलीसोबत १५वा विवाह केला आहे. यांना किमान १५ राण्या व ३० मुले आहेत. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महाल बांधले आहेत.
या देशात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ‘उम्हलंगा कार्यक्रम’ आयोजित केला जातो. या कार्यक्रमात देशभरातील १० हजाराहून अधिक अविवाहित तरुणी सहभागी होतात. यावेळी राजा त्यांच्यामधील एकीची निवड करतो आणि तिच्यासोबत लग्न करतो.
२००९ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार, मस्वाती हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांच्याकडं ६२ अलिशान गाड्यांचा ताफा असून त्यात पाच लाख डॉलरच्या मेबेक कारचाही समावेश आहे. या गाड्यांचे फोटो काढण्यास बंदी आहे.
स्वाझीलँडची जनता दारिद्र्यामध्ये जीवन कंठत असताना उम्स्वातीकडे मात्र प्रचंड प्रमाणावर संपत्ती असून त्याचे राहणीमान आलिशान व उधळ्या स्वरूपाचे आहे. २०१४ सालच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये संसदेने उम्स्वाती परिवाराच्या खर्चासाठी प्रतिवर्ष ६१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची तरतूद केली.उम्स्वातीने स्वाझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याची वृत्ते देखील प्रकाशित झाली आहेत.
Comments are closed