नवी दिल्ली दि.१८ (punetoday9news) :- इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या १३व्या सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर (IPL Sponsor) ची घोषणा करण्यात आली आहे. ड्रिम इलेव्हन यंदाच्या सीझनचं टायटल स्पॉन्सर असणार आहे. VIVO ला १३ व्या हंगामाच्या टायटल स्पॉन्सवरून हटवल्यानंतर Dream 11 यंदा आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असणार आहे.

आयपीएलचे प्रमुख आयोजक बनण्याच्या शर्यतीत अनअकॅडेमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते. अनअकॅडेमी २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली होती. ड्रीम इलेव्हनने २५० कोटींची बोली लावून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर आपल्या नावे केलं आहे.

आधी आयपीएलचं टायटल स्पॉन्सर VIVO कडे होतं. परंतु, भारत आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे बीसीसीआय ने विवोकडून सर्व अधिकार काढून घेतले होते. विवोने २०१८ ते २०२२ पर्यंत म्हणजेच, पाच वर्षांसाठी २१९० कोटी रुपये बीसीसीआयला देत आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले होते.

Comments are closed

error: Content is protected !!