पिंपरी, दि.१८ (punetoday9news) :- गावठी कट्टे व जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास सांगवी पोलीसांनी गजाआड केले आहे
दि. १७ रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकाचे चंद्रकांत भिसे , शशिकांत देवकांत , दिपक पिसे सांगवी पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना खबर मिळाली की दि १७ रोजी ११.३०वा.विलाकासा हॉटेलचे जवळ , नाशिक फाटा ओव्हर ब्रिजच्या खाली नदीच्या बाजुला पिंपळे गुरव, पुणे येथे एक इसम गावठी कट्टा ( पिस्टल ) घेवुन येणार आहे. त्या नुसार तपास पथकाचे सपोनि दत्तात्रय गुळीग यांनी सदर बातमीचा आशय रंगनाथ उंडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सांगितले .त्यानुसार सापळा रचुन लक्ष ठेवून आरोपीस पकडण्यात आले .
मिळालेल्या माहितीनुसार ११.३५ वा च्या सुमारास बातमीदाराने सांगीतलेल्या वर्णनाचा एक इसम स्ट्रिट लाईटच्या उजेडात संशयीतरित्या फिरताना दिसला असता स्टाफने पंचासमक्ष सदर संशयीत इसमास ताब्यात घेवन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मंगेश सुरेश जाधव (वय- २१ वर्षे , रा – बिल्डींग नं ७ , फ्लॅट नं ३३ , ओटा स्किन निगडी) असे सांगतले त्यानंतर त्यास येथे कशासाठी आला आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या मागील बाजुस कमरेला टी शर्टचे आत एक देशी बनावटीचा गावठी कट्टा लपवलेला मिळुन आला व पॅन्टचे उजव्या खिशात एक गावठी कट्टा ( पिस्टल ) मिळुन आला तसेच डाव्या खिशात ६ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला . शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे त्याने विनापरवाना १ गावठी कट्टा १ पिस्टल व ०६ जिवंत काडतुस जबळ बाळगुन गुन्हा केल्याची खात्री झाली . त्यानुसार आरोपी मंगेश सुरेश जाधव (वय- २१ वर्षे , रा- बिल्डींग नं १० , फ्लॅट नं ३३. ओटा स्किम निगडी पुणे) याचे विरुध्द पोलीस शिपाई १६७७ शशिकांत यशवंत देवकात , यांनी तक्रार दिल्याने सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३५३/२०२० भा.ह.का. कलम ३ ( २५ ) सह महा.पो. अधि . कलम ३८ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे . तसेच अटक आरोपी याचेवर वाकड पोलीस ठाणे येथे दरोडयाचा व निगडी पोलीस ठाणे येथे मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद आहे .
रंगनाथ उडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे , अजय भोसले पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सांगवी पोलीस ठाणे , यांच्या मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग , पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके , चंद्रकांत भिसे , रोहीदास बोऱ्हाडे , कैलास केंगले , सुरेश भोजणे , शशिकांत देवकांत , दिपक पिसे , विनायक देवकर , अरुण नरळे , नितीन खोपकर , अनिल देवकर , हेमंतकुमार गुत्तीकोंडा , यांनी कामगिरी केली आहे .
Comments are closed