मुंबई,दि.१९ (punetoday9news):- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. त्यांनी केवळ सत्यमेव जयते! हे दोन शब्द ट्विट केले आहेत.

 

पार्थ यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली होती. त्यावर ती पक्षाची भूमिका नसून त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी पार्थ यांच्याबाबत काही टिपण्णीदेखील केली होती.

या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. २७ जुलैला अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी हे मागणी करणारं पत्र गृहमंत्र्यांना दिलं होतं.

 

Comments are closed

error: Content is protected !!