पिंपरी,दि.२०( punetoday9news ):- महाराष्ट्रातील जिम कोरोना मुळे बंद करण्यात आहेत. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने आता जिम पुन्हा सुरु केल्या पाहिजेत अशी मागणी विविध नेत्यांनी केली आहे .
त्यात आता सुप्रिया सुळे यांनीच थेट मागणी केल्याने राज्यातील जिम लवकरच सुरु होण्याची आशा जागृत झाली आहे . जिम चालकांनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे हे सांगत जिम सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रामदास इंगळे यांनी यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना एक पत्र पाठवले आहे. हे पत्र ट्विट करून त्याद्वारे सुप्रिया सुळे यांनी जिम पुन्हा सुरु करा अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत.परंतु आता अनलॉक ची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. pic.twitter.com/cWL9eXGfLr
— Supriya Sule (@supriya_sule) August 19, 2020
Comments are closed