चौथ्यांदा देशात स्वच्छतेत पहिल्या स्थानावर इंदोर .

पुणे १५ व्या तर पिंपरी चिंचवड २४ व्या स्थानी .

नवी दिल्ली,दि.२०(punetoday9news):- भारत सरकारचे स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा निकाल जाहीर झाला आणि एकदा इंदौर ने बाजी मारत पहिले स्थान पटकावले . सरकार द्वारा जारी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये इंदौर या वर्षातही सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम स्थानावर कायम राहिले आहे. गुजरातचे सूरत शहर दुसऱ्या स्थानावर तर तिसर्‍या स्थानावर नवी मुंबई आहे.

केन्द्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यवाहिनीद्वारे आयोजित कार्यक्रम ‘स्वच्छ महोत्सव’ या कार्यक्रमात एकूण १२ शहर शहरांचे पुरस्कार प्राप्त झाले. आधीच्या बातमीनुसार नरेंद्र मोदींच्या देशातील शहर स्वच्छ-सफाई संबंधी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चे परिणाम जाहीर झाले.

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता ॲपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.

Comments are closed

error: Content is protected !!