पिंपरी,दि.२० ( punetoday9news) :- पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी येथे वडापावचे पैसे न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला . या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे .
राज तापकीर , ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील ( वय २३ ) , प्रवीण ज्योतीराम धुमाळ ( वय २१ ) , अविनाश धनराज भंडारे ( वय २३ ) , अजय भारत वाकोडे ( वय २३ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे ( वय २१ ) , प्रेम वाघमारे ( सर्व रा . काळेवाडी ) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शुभम जनार्दन नखाते ( वय २२ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी शुभमचे वडील जनार्दन आत्माराम नखाते ( वय ५२ , रा . काळेवाडी ) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी ज्ञानेश्वर पाटील आणि अजय वाकडे या दोघांची काळेवाडी परिसरात वडापावची गाडी आहे . काही दिवसांपूर्वी मयत शुभम याने ज्ञानेश्वर पाटील याच्या गाडीवर वडापाव खाऊन त्याचे पैसे दिले नव्हते.यावरून त्यांच्यात भांडण झाले होते . त्या दोघांनीही एकमेकांना संपविण्याची भाषा केली होती . त्यानंतर शुभम याने तुमच्या वडापावच्या हातगाड्याच येथे नकोत अशी भूमिका घेतली होती त्यामुळे अजय वाकोडे याच्याही मनात शुभमबाबत नाराजी निर्माण झाली . शुभम आणि आरोपी यांच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढतच गेली . दोन दिवसांपूर्वीही आपली आपसांतील भाडणे मिटवून टाकू , असे सांगत बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या आरोपींनि शुभमला थेरगाव येथील एका कार्यालयाजवळ बोलवून कोयत्याने वर केले .
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातपैकी पाच आरोपींना त्वरीत अटक केली . तर उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत .
Comments are closed