आपला देश कोरोना मुक्त कर; बाप्पाला साकडं

पिंपरी,दि.२०(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांनी यंदा सर्व गणेश मंडळांना साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . त्यानुसार सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ उंडे यांनीही सांगवी विभागातील गणेश मंडळांना आवाहन केले होते . या केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सुयोग कॉलनी मित्र मंडळ R.NO : महाराष्ट्र/3210/ पुणे, विनायक नगर,पिंपळे गुरव या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी आपसात चर्चा करून समाजहिताचा निर्णय घेत यंदा गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे .

कार्यकर्त्यांच्या मते सद्यस्थितीतील कोरोना ची हि स्थिती वाईट आहे नागरिकांचे हाल होत आहेत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत . आपल्या परिसरातील नागरिक कोरोना मुक्त व्हावे व पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे जनजीवन सुरळीत व्हावे . यासाठी आम्ही यंदाचा गणेश उत्सव साजरा करणार नाही . आपल्या साठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या पोलीस , डॉक्टर , स्वच्छता कर्मचारी यांना सहयोग करून त्यांच्या सोबत कोरोना युद्धात सहभागी आहोत.
मंडळाच्या या निर्णयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी स्वागत व कौतुक ही केले आहे. याचबरोबर शहरातील इतर मंडळांनीही असा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत .

Comments are closed

error: Content is protected !!