पिंपरी,दि.२०( punetoday9news):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महापालिका आयुक्त यांच्या आवाहनानुसार नुसार पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवीतील सत्ता प्रतिष्ठान गणेशोत्सवात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणार आहे.
यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रतिष्ठानच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक व प्रतिष्ठापना न करता साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातही दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सात दिवसामध्ये विशेष प्राविण्य घेतलेले १० व १२ वी तील प्रत्येकी पाच विद्यार्थी सत्कार , वृक्षारोपण कार्यक्रम , रक्तदान शिबीर, कोराना योद्धांचा सन्मान, दिव्यांगाना मदत , म.न.पाच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान, संविधानाचे वाटप असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने महाराष्ट्रातून निवडलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पाच गुणवंताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Comments are closed