पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठक संपन्न .
मुंबई, दि.२१ (punetoday9news) :- पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध असून तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वने तर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत व गावे वगळण्यासंदर्भातील आपली ही भूमिका केंद्र सरकारला स्पष्टपणे कळविण्यात येईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले कि पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रामधून गावे वगळण्यापूर्वी वनविभागाने आधी त्या गावांचा ड्रोन सर्व्हे करावा, तेथे कुठले वनेतर उपक्रम आहेत याची माहिती घ्यावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा. जी गावे वाघ किंवा इतर वन्यजीवांच्या भ्रमण मार्गामध्ये किंवा वनक्षेत्रात येतात, त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
त्यानुसार पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम घाटातील ६२ गावांचा ड्रोन सर्व्हे करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.तसेच वन, उद्योग व खनिकर्म विभागानेही यावेळी सादरीकरणाद्वारे आपली भूमिका मांडली.
Comments are closed