पिंपरी,दि.२१( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड मधील सांगवीतील छञपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालय व नूतन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित इको फ्रेंडली गणपती बनवणे कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन गणपती बनवले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता १० वी चे असून नुकताच शाळेचा बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. या आनंदात विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बनवून बापाचा आशीर्वाद घेतला .

शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. होता.विद्यार्थांना गणपती बनवण्यासाठी शाळेतून माती दिली होती सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा गणेशाच्या मूर्ती बनवल्या आहेत.

आज देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे विद्यार्थी घरूनच ऑनलाईन या उपक्रमात सहभागी झाले होते.आमची शाळा ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. आणि शाळा जरी बंद असली तरी शिक्षक मुख्याध्यापक हे आमच्याबरोबर आहेत व शिक्षण सुरू आहे आणि मूल आमच्याशी बोलतात असे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी मनापासून अभिनंदन केले.

Comments are closed

error: Content is protected !!