मुंबई, दि. २१( punetoday9news):- उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी ६ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाजॉब्स वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून सुरू केले आहे . याचेच महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे.
टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरावाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
यासाठी राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या http://
मोबाईल ॲप साठी आवश्यक बाबी:-
वैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.), मोबाइल क्रमांक (आवश्यक), इमेल आयडी (वैकल्पिक), अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा, पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक) प्लेस्टोअर मधुन या लिंक द्वारे https://play.google.com/store/
Comments are closed