पुणे दि. २१( punetoday9news):- केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांचे सर्वेक्षण २०२० चा निकाल २० ऑगस्ट रोजी जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेचा देशात दुसरा व लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच जेजुरी नगरपरिषदेचा सहावा तर इंदापूर नगरपरिषदेचा १४ वा क्रमांक व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चा ८ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
वरील पुरस्कार प्राप्त सासवड व लोणावळा नगरपरिषद यांना केंद्रीय नगरविकास मंत्री हरमनप्रीत कौर यांचे हस्ते मंत्रालय, मुंबई येथे व इंदापूर नगरपरिषद, जेजुरी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोंमेंट बोर्ड यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नगर विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर हे मंत्रालय स्तरावर तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,देहू कॅन्टोंन्मेंटचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल, इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जेजुरी नगराध्यक्षा विणा हेमंत सोनवणे, मुख्याधिकारी पुनम कदम, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, न.पा. प्रशासन सहा.संचालक रामनिवास झंवर, विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.
Comments are closed