.

पिंपरी.दि.(punetoday9news ):- पिंपरी चिंचवड मधील शालेय पोषण आहारात काम करणाऱ्या महिला बचत गटाचे पैसे काही दिवस रखडले होते त्यामुळे दि ४ ऑगस्ट रोजी मंदा फड यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यासंदर्भात निवेदन देवून लवकर पैसे बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली होती .

त्या निवेदनाची दखल घेत महापालिके कडून दिनांक २० ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहारात काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील शालेय पोषण आहारात काम केलेल्या महिला बचत गटातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच सर्वांनी याबाबत शिवसेना विभाग संघटिका मंदा फड यांचे आभार मानले.

याबाबत मंदा फड यांच्याशी संपर्क केला असता हि लढाई अजून पूर्ण पणे संपलेली नाही जो पर्यंत महिला बचत गटांचा एक ना एक रुपया प्रशासनाकडून त्यांना मिळवून दिल्या शिवाय शिवसेना महिला आघाडी व मी शांत राहणार नाही असे त्यांनी सांगितले तसेच महापालिकेने रक्कम जमा केल्या बद्दल यात काम करणाऱ्या व मदत केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.


त्याच बरोबर अजुन ही बचत गटांची जी काही रक्कम अजुन भेटलेली नाही ती रक्कम मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आमच्यासोबत एकत्र येऊन पाठपुरावा करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!